शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून!

By हरी मोकाशे | Updated: August 19, 2023 17:02 IST

मघामुळे आशा वाढल्या : गतवर्षीच्या तुलनेत २०५ मिमी पावसाची तूट

लातूर : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून खरीप पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२३.९ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत २०५.४ मिमी पावसाची तूट आहे.

जिल्ह्यात यंदा विलंबाने पावसाला सुरुवात झाली. मृग कोरडा गेल्याने खरीप पेरणीस उशीर झाला. जून अखेरीस पासून काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या सुुरू होत्या. वेळेवर पावसाची बरसात न झाल्याने जिल्ह्यात उडीद, मूग आणि तुरीच्या पेऱ्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे आंतर मशागतीची कामे खोळंबली होती. परिणामी, पिकांत तण वाढले होते.

जुलैअखेरपासून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील मशागतीच्या कामांना वेग आला होता. शेतकरी तण नष्ट करण्यासाठी तणनाशकांची फवारणी करीत होते. तद्नंतर जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

सोयाबीन फुलोऱ्याच्या स्थितीत...मध्यंतरी पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन जोमात उगवले. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. सध्या सोयाबीन हे फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनसह अन्य पिकांना पावसाची गरज आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने हलक्या रानावरील पिके दुपार धरू लागली आहेत. दरम्यान, गुरुवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

मध्यम प्रकल्पात २० टक्के जलसाठा...जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात सध्या २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारेच्या १३४ प्रकल्पात २३ टक्के तर २७ बॅरेजेसमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासाठी तसेच पिकांसाठी पावसाची गरज आहे.

सर्वाधिक पाऊस देवणी तालुक्यात...तालुका - आतापर्यंतचा सरासरी पाऊस मिमीमध्येलातूर - ३०५.६औसा - २५१.९अहमदपूर - ३०४.४निलंगा - ३०८.०उदगीर - ४४६.७चाकूर - २७१.२रेणापूर - २५६.५देवणी - ५०१.८शिरुर अनं. - ३५०.९जळकोट - ३७८.७एकूण - ३२३.९

गेल्यावर्षीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पात ६३ टक्के पाणी कमी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून त्यावर विविध गावांच्या जल योजना आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही सातत्याने दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नाही. व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अद्यापही झाला नाही. तावरजा प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्यम प्रकल्पात ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या केवळ २० टक्के आहे.

दोन प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा...प्रकल्प - सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा - गेल्या वर्षीचा पाणीसाठातावरजा - २% - ४१%रेणापूर - २४% - ९८%व्हटी - ०० - ६७%तिरू - ०० - ८१%देवर्जन - ३९% - १००%साकोळ - ५४% - १००%घरणी - २८% - १००%मसलगा - ३०% - ८७%एकूण - २०% - ८३%

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी