शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

By संदीप शिंदे | Updated: April 21, 2023 18:36 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला.

लातूर : जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ची अंमलबजावणी तसेच आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि २० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, सचिव डॉ. पी.के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा, सचिव श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी लातूरसह देशभरातील १५ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रधानमंत्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, आरोग्यवर्धिनी सल्लागार सोनाली नागठाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे उपस्थित होते.लातूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. त्यात आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवांचा ०समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराने उत्साह, समर्पण वाढण्यास मदत - जिल्हाधिकारीलातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने आरोग्य विभागाचा चमू आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढला असून, यापुढे सर्वजण अधिक समर्पण भावनेने काम करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.

 

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरprime ministerपंतप्रधान