शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

दुष्काळात होरपळतोय अवघा लातूर जिल्हा, शहराला १२ दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:49 IST

लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.

लातूर  - लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे.़ शिवाय, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची होरपळ होत आहे़ जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पावर ग्रामीण भागाची मदार आहे़ मात्र या प्रकल्पात केवळ ३़७८ टक्के जलसाठा असल्याने भटकंती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात ५८ टँकरद्वारे ४६ गावे आणि १२ वाडी-तांड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. गत पावसाळ्यात ६४ टक्के पाऊस झाला़ परिणामी, जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली़ साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, मसलगा, व्हटी, तिरू व देवर्जन या मध्यम प्रकल्पांपैकी आजघडीला साकोळ, घरणी आणि मसलगा या तीन मध्यम प्रकल्पांचा अपवाद वगळता पाणीपुरवठा होऊ शकत नाही़ प्रकल्प कोरडेच पडले आहेत़ १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे.त्यामुळे या प्रकल्पांचाही जिल्ह्याला सध्यातरी उपयोग नाही़ शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातही १७़७१९ दलघमी मृत पाणीसाठा आहे़ जून अखेरपर्यंत या पाणी पुरविण्यासाठी मनपा प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे़ गेल्या १५ दिवसांपासून पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर आणला आहे़पशुधनाच्या चा-याचा प्रश्न जटिलजिल्ह्यात लहान- मोठी ७ लाख ५२ हजार पशुधनाची संख्या आहे़ ५ लाख ७२ हजार २१९ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा टंचाई जाणवत आहे़ दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अहिंसा संघाच्या पुढाकाराने चारा छावणी सुरू करण्यात आली असून, त्यात जवळपास एक हजार जनावरे दाखल झाली आहेत़ चारा टंचाईमुळे काही शेतकरी कर्नाटकातून चारा आणत आहेत़345 गावांत टंचाई३४५ गावे आणि ९६ वाडी-तांड्यांना ६०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाकडे ७२ गावे व १७ वाडी-तांड्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली असून त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.५ हजारच मजुरांना कामजिल्ह्यात ५ लाख ८२ हजार नोंदणीकृत मजूर आहेत़ त्यापैकी केवळ पाच हजार मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत़ प्रशासनाकडून मागेल त्याला काम देण्याचा दावा आहे़ मात्र मजुरी कमी असल्याने मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई