शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच अन् कर्मचार्‍यांत वाद वाढला!

By हरी मोकाशे | Updated: June 15, 2024 18:01 IST

ग्रामसभेतून नवीन कर्मचार्‍यांची भरती करणार

लातूर : किल्लारी ग्रामपंचायत डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अडचण होत आहे. त्यातूनच कार्यवाहीच्या भीतीपोटी कर्मचारी शुक्रवारपासून अचानक संपावर गेले आहेत. दरम्यान, नागरिकांची कागदपत्रांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून पंचासमक्ष कार्यालय उघडून ग्रामविकास अधिकार्‍यांनी दिवसभर आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण केल्याची माहिती सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांनी दिली.

औसा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत किल्लारीची आहे. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची कर्मचार्‍यांना अडचण होत आहे. त्यामुळे ते विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे काहींना नोटीस देण्यात आली आहे. कर वसुली होत नसल्याने कर्मचारी कमी करण्यासंदर्भात विशेष मासिक बैठक होणार होती, असे सरपंचांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांनी धनादेशाद्वारे अनामत रक्कम यापूर्वीच उचलली आहे. ती रक्कम कर्मचाऱ्यांना कशी दिली, हे गुलदस्त्यात आहे. गावात फिरून जे कर्मचारी काम करतात, त्यांना इंधन खर्च दिला जातो. त्यांनीही कामावर आल्यानंतर आणि जाताना ऑनलाइन पंच करणे आवश्यक आहे. शिवाय, डिजिटलमुळे कर्मचारी नेमके कोठे आहेत, याची माहिती समजणार आहे. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे नागरिकांतून स्वागत होत असले तरी कर्मचारी जुन्या पद्धतीने काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, सुमन भोसले, वैशाली गुंजोटे, बबिता कांबळे आदींनी सांगितले. यावेळी श्रीकांत कोणे, पंडितअण्णा गावकरे, डॉ. हरिश्चंद्र कांबळे, किशोर बिराजदार, उमाटे आदींची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत डिजिटल...

कर क्यूआर कोड व स्कॅनरने स्वीकारण्यावर भर आहे. कर व इतर रक्कम भरणाऱ्यांना त्या रकमेचा मोबाइलवर एसएमएस मिळणार आहे. सीसीटीव्हीमुळे मासिक बैठका, ग्रामसभेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली कामे ग्रामस्थांना मोबाइलवर पाहता येणार.

बीडीओंच्या निर्णयाकडे लक्ष...

गटविकास अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही, असे संपावर गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच