शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Latur: पुढे चोर आहेत म्हणत दाम्पत्यास लुटले; दुचाकीस्वाराने पाठलाग करून एकास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:18 IST

पाठलाग करून काही अंतरावरच रेल्वे गेटजवळ तिघांपैकी एकास दुचाकीसह पकडून ठेवले

उदगीर (जि. लातूर) : येथून शेल्हाळ मार्गे भवानी बिजलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेल्हाळ गावापुढील महादेव मंदिरासमोर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावून पुढे चोर आहेत म्हणत, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख २५ हजार रुपये पळवून घेऊन गेले. मात्र पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाठलाग करून काही अंतरावरच एका चोराला रेल्वे गेटजवळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

उदगीर येथून शेल्हाळ मार्गे भवानी बिजलगावकडे फिर्यादी हे पत्नीसह दुचाकीवरून जात असताना शेल्हाळ गावापुढे महादेव मंदिर जवळ समोरून दोन दुचाकीवरून तीन अनोळखी व्यक्ती येऊन दुचाकी आडवी लावून सांगितले की, पुढे चोर आहेत अंगावरील दागिने काढून बॅगमध्ये सुरक्षित ठेवा. त्यामुळे फिर्यादीच्या पत्नीने तिचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून बॅगमध्ये ठेवत आसताना हातातील गळ्यातील काळी मण्याची सोन्याची एक तोळ्याची पोत व कानातील पाच ग्रॅम सोन्याचे झुमके व दमदाटी करून फिर्यादीच्या खिशातील २५ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेऊन दुचाकीवरून पळून गेले.

तेवढ्यात पाठीमागून एक दुचाकीस्वार आला. त्याने पाठलाग करून काही अंतरावरच रेल्वे गेटजवळ तिघांपैकी एकास दुचाकीसह पकडून ठेवले व पोलिसांना बोलावून त्या चोराला ताब्यात दिले. याप्रकरणी ज्ञानोबा गणपतराव खटके (रा. भवानी बिजलगाव, ता. कमलनगर, जि. बिदर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बाकरअली अहमदअली (रा. शिवाजी नगर, इराणी गल्ली, परळी) व इतर दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी