शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Latur: हगदळ शिवारात गांजाची लागवड; नऊ किलो गांजा जप्त, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:11 IST

१ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल : अहमदपूर तालुक्यात पोलिसांची कारवाई

लातूर : पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तब्बल १ लाख ३७ हजार ७७५ रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. ११ जून २०२५ रोजी रात्री अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हगदळ गावाच्या शिवारात गांजाची लागवड केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आणि अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ छापा टाकला.

हगदळ शिवारातून गांजाचे झाड जप्तहगदळ गावाच्या शिवारातील राजू ऊर्फ देवराव मुंडे (वय ३२, रा. हगदळ, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्या शेतातून पोलिसांनी नऊ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेतमालक राजू ऊर्फ देवराव मुंडे याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आणि अहमदपूरचे पोलिस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहायक फौजदार दिंडगे, तसेच पोलिस अंमलदार तुराब पठाण, चौधरी, कछवे, मदने, केंद्रे, सूर्यवंशी आणि मुंडे यांचा समावेश होता.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी