शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Latur Accident: नादुरुस्त ट्रकवर दुचाकीस्वार आदळले; एक ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:41 IST

बाईक चालवणारा तरुण ठार झाला असून सोबतचे दोघे जखमी झाले आहे

किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील देवकरा पाटीजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकवर दुचाकीस्वार आदळल्याने एकजण ठार, तर दोघे गंभीर झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वा. च्या सुमारास घडली आहे.

हणमंत भागवत जाधव (३५, रा. बनसावरगाव, ता. चाकूर) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकूर तालुक्यातील बनसावरगाव येथील हणमंत भागवत जाधव, गोविंद नाईकवाडे (२५, रा. नागोबानगर, अहमदपूर) व माऊली कांबळे (४०, रा. लातूर रोड) हे तिघे काही कामानिमित्त दुचाकीवरून (एमएच २४, बीएफ ०८१७) अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथे गेले होते. तेथील काम आटोपून सोमवारी रात्री ते अहमदपूरकडे परतत होते. 

तेव्हा देवकरा पाटीजवळ थांबलेल्या नादुरुस्त ट्रक (एपी २७, डब्ल्यू ९५९५) ला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक हणमंत जाधव हे जागीच ठार झाले. दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती किनगाव पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर