शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उन्हामुळे रक्ताचा तुटवडा; शिबिरे होत नसल्याने नातेवाइकांची धावपळ

By हणमंत गायकवाड | Updated: April 8, 2024 17:54 IST

लातूर शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त गटाची कमतरता

लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीसह अन्य सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त गटांचा तुटवडा आहे. यामुळे रुग्ण नातेवाइकांना रक्तगट बॅग मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सरकारीसह अन्य सहा रक्तपेढ्या लातूर शहरात आहेत. या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे.

गेल्या काही दिवसांपासून तीव्र ऊन आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. ३७ ते ३९ अंशांवर तापमान गेलेले आहे. यंदाचा उन्हाळा कडक आहे. उन्हाची तीव्रता लाहीलाही करणारी आहे. त्यामुळे शिबिरे होत नाहीत. शिबिरे झाली तरी प्रतिसाद मिळत नाही. सात एप्रिल रोजी रविवार असल्याने काही ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली. त्यातून काही रक्त बाटल्या संकलित झाल्या आहेत. हा रुग्ण नातेवाइकांसाठी काही अंशी दिलासा म्हणावा लागेल. पण उन्हाच्या तीव्रतेमुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. त्यामुळे बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे.

रक्तपेढ्यांमध्ये या रक्त गटांचा तुटवडा...भालचंद्र रक्तपेढीत ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह रक्त गटाचा तुटवडा आहे. या रक्तपेढीसाठी रविवारी एक-दोन रक्तदान शिबिर झाले. त्यातून काही बाटल्या रक्त संकलित झाल्या आहेत. हाच काय तो थोडा दिलासा आहे. मात्र रक्ताचा तुटवडा असल्याने नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्याने शिबिरांवर परिणाम.....महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सध्या सुरू आहे. त्यामुळे एनसीसी एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून होणारे रक्तदानाचे कॅम्प होत नाहीत. दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. आता पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत. परिणामी, रक्तदान शिबिर आयोजित कोणी केले तरी तितका प्रतिसाद मिळत नाही. शिवाय, लोकसभा निवडणुकीच्या माहुल सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचार कामात अनेक संघटना, राजकीय पक्ष व्यस्त आहेत. त्याचा परिणाम रक्त तुटवड्यावर झाला आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर हा तुटवडा कमी होईल. सध्या अत्यावश्यक आणि गरज असणाऱ्या रुग्णांसाठी रक्तपेढ्यांकडून रक्त उपलब्ध करून दिले जात असल्याचे अनेक रक्त बँकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीlaturलातूर