किनगाव : येथील कृषी विभागातर्फे दि. २२ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. या अनुषंगाने किनगाव येथील मारोती घनश्याम मुंडे व बस्वराज गोविंद हुडगे या प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला.
यंदा खरीप मान्सूनच्या तोंडावर सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना रासायनिक जैविक, (पिसबी रायझोबियम) बुरशीनाशक यांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी मंडल अधिकारी शरद पवार यांनी अभिनव डाळिंब उत्पादक शेतकरी गटातील सभासदांना केले. तसेच बस्वराज गोविंद हुडगे यांच्या मग्रारोहयो अंतर्गत पेरू लागवड व शास्त्रोक्त पद्धतीने ऊस लागवड याबद्दलचे मार्गदर्शन केले तर तालुका तंत्र व्यवस्थापक ‘आत्मा’चे वासुदेव कुलकर्णी यांनी माहिती दिली. यावेळी तालुका तंत्र व्यवस्थापक पुरी विजयकुमार, नितीन मुंढे, संजय हुडगे, बालाजी शेळके, राजीव मुंढे, व्यंकट मुंढे, संभाजी मुंढे, बस्वराज मोहिते, गणेश मुंढे, आदी शेतकरी उपस्थित होते.