शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप धोक्यात; तात्काळ पंचनाम्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

By हरी मोकाशे | Updated: September 2, 2023 19:33 IST

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे ...

लातूर : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री महाजन यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पीकविम्यासंदर्भात योग्य कारवाई लवकरात लवकर करावी. पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन कृषी, महसूल व संलग्न सर्व विभागांनी उपाययोजनांचे योग्य नियोजन करावे. यात दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या आहेत.

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांकडून देण्यात आली.

पाण्याचे नियोजन करावे...लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाची पाणीपातळी २४ टक्क्यांपेक्षाही खाली गेली आहे. या बाबीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणांनी त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच कोठेही पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केल्या.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस