शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

‘जंकफुड’मुळे लहान मुलांमध्ये बळावताहेत पोटविकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 1:46 PM

जंकफूडमुळे लहान मुलांमध्ये पोटविकार बळावत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयातील केमिकल्समुळे बालकांच्या आरोग्यांवर विपरित भूक मंदावण्याचे प्रमाणही वाढले

उस्मानाबाद : हट्ट धरला की, पालकही मागेपुढे न पाहता अन् दुष्परिणामांचा विचार न करता, पाकीटबंद चटकदार खाद्यपदार्थ मुलांच्या हाती सोपवून मोकळे होतात. परंतु, असे पाकिटबंद पदार्थ दीर्घकाळ टिकावेत, यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्समुळे बालकांच्या आरोग्यांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये पोटविकार बळावत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : सध्या लहान मुलांमध्ये कोणकोणते आजार आढळून येतात?सोनटक्के : लहान मुलांमध्ये निमोनिया, गॅस्ट्रो, टायफाईड, डेंग्यू, गोचीडताप यासारखे नेहमीचे आजार आढळून येतात. परंतु, मागील काही वर्षात पोटविकाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. प्रतिदिन दाखल होणाऱ्या पेशेन्टपैकी दहा ते बारा टक्के बालके या विकाराने त्रस्त असतात.

प्रश्न : पोटविकाराचे प्रमाण नेमके कशामुळे वाढतेय?सोनटक्के : सध्या बाजारामध्ये पाकिटबंद जंकफुडची काही कमी नाही. वरतून मुलांना आकर्षित करण्यासाठी खेळण्यांचाही वापर केला जात आहे. त्यामुळे अनेक मुले खेळण्यांसाठी अशा पाकिटबंद खाद्य पदार्थांचा पालकांकडे हट्ट करतात. अशावेळी पालकही त्यांची समजूत काढण्याच्या फंद्यात पडत नाहीत. पाच-दहा रूपयांचे जंकफुडचे पाकिट हाती सोपवून मोकळे होतात. हे पदार्थ चटकदार असतात. त्यामुळे मुलेही ते आवडीने खातात. आणि येथेच या आजाराचे मूळ दडले आहे. हे खाद्यपदार्थ जास्तकाळ टिकावेत यासाठी वापरलेले वेगवेगळे केमिकल्स पोटविकारास कारणीभूत ठरतात.

प्रश्न : जंकफुड टाळण्यासाठी काय करायला हवे?सोनटक्के : लहान मुल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याला आकार द्यावा तसे ते घडते. त्यामुळे मुलांना संबंधित जंकफुडमुळे होणाऱ्या आजारांबाबत सांगणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या भाषेत पटवून दिल्यास नक्कीच ते ऐकतात. यानंतरही काही बालके जंकफुडचा हट्ट सोडतच नसतील, तर त्यांचा हट्ट सहजासहजी पूर्ण करू नये. हट्ट करूनही आपले बाबा पाकिटबंद पदार्थ  देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर मुलांतील हट्टी वृत्ती बऱ्यापैकी कमी होते.

प्रश्न : जंकफुडच्या अतिसेवनाने आणखी कोणते दुष्परिणाम उद्भवतात?सोनटक्के : लहान मुले ही दिवसभर खेळण्या-बागडण्यात दंग असतात. त्यामुळे मुलांना नियमित भूक लागणे अपेक्षित असते. परंतु, जी मुले जास्त जंकफुड खातात, त्यांच्यामध्ये पोटविकारासोबतच भूक मंदावण्यासारखे दुष्परिणामही आढळून येऊ लागले आहेत. ही बाब अत्यंत घातक आहे. मुलांमधील भूक मंदावल्यास त्यांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पालिकांनी जंकफुडबाबत वेळीच जाकरूक होणे गरजेचे आहे.

प्रश्न : आपण पालकांसाठी काही सल्ला देऊ इच्छिता का?सोनटक्के : होय, नक्कीच. मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये फळांचा अधिकाधिक उपयोग करायला हवा. फळांसोबतच पौष्टिक आहारावरही भर देणे गरजेचे आहे. घरगुती पदार्थ रूचकर बनविल्यास मुले, ते आवडीने खातात. ज्या मुलांच्या आहारात पौष्टिक अन्न अधिक असते, अशी मुले फारशी आजारी पडत नाहीत.

टॅग्स :Junk Foodजंक फूडHealthआरोग्यdoctorडॉक्टर