शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुर येथे आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे जेलभरो आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:10 IST

विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

अहमदपूर(लातूर ) : मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण व संरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़

मुस्लिम समाजाची परिस्थिती शासन नियुक्त समित्यांनी शासनापुढे मांडत आपला अहवाल सादर केला होता़ परंतु, शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केला आहे़ समाजाच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहे़ मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होत आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. तसेच मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे़ यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात येऊन राज्य शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ मुस्लिम समाजाबरोबर मराठा समाज, धनगर समाज व लिंगायत समाजालाही शासनाने आरक्षण द्यावे, अशा घोषणा देण्यात आल्या़

विविध समाजांचा पाठिंबामुस्लिम समाजाच्या या आंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा सेवा संघ, मराठा समाज, धनगर समाजाने पाठिंबा दर्शविला़ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी केली़ दरम्यान, कार्यकर्त्यांनी स्वत:हून अटक करवून घेतली़ काही वेळाने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडून दिले़.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षणlaturलातूरJail Bharo Andolanजेल भरो आंदोलन