शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयटी, एम्स’सारख्या संस्था आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार! क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही

By राजकुमार जोंधळे | Updated: July 15, 2023 03:34 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात आ. संजय बनसोडे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने त्यांचा येथे नागरी सत्कार करण्यात आला.

उदगीर (जि. लातूर) : उदगीर व जळकोटातील जनतेची साथ हीच माझी ऊर्जा आहे. मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसीसह एखादा मोठा उद्योग व आयआयटी, एम्ससारख्या संस्था आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी येथे दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळात आ. संजय बनसोडे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने त्यांचा येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे होते. यावेळी आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, एकनाथ महाराज लोमटे मलकापूरकर, बसवराज पाटील नागराळकर, ॲड. व्यंकट बेद्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, पंडित धुमाळ, रामचंद्र तिरुके, रिपाइंचे देवीदास कांबळे, बापूराव राठोड, मंजूरखां पठाण, भरत चामले, चंद्रकांत वैजापुरे, मुन्ना पाटील, माजी नगराध्यक्ष अफसर शेख, रमेश अंबरखाने, शिवाजीराव साखरे, मन्मथ किडे, मौलाना हबेबूर रहेमान, जितेंद्र शिंदे, ॲड. दीपाली औटे, उषा रोडगे, रामराव राठोड, पप्पू गायकवाड, प्रा. प्रवीण भोळे, अनिल इंगोले, बालाजी देमगुंडे, बाळासाहेब मरलापल्ले, कुणाल बागबंदे, नागसेन भन्ते आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे, सूत्रसंचालन रसूल पठाण, अनिता येलमटे यांनी केले. आभार पद्माकर उगिले यांनी मानले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार आमचे दैवत... -मंत्री संजय बनसोडे म्हणाले, मतदारसंघासाठी ९०० कोटींची वॉटरग्रीड योजना मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे पाणी समस्या जाणवणार नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार हे आपले दैवत आहे. देवेंद्र फडणवीस हा मोठ्या मनाचा माणूस असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. सत्कार सोहळा सुरू असताना कॅबिनेट मंत्री बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री हे विभाग मिळाल्याचे समजताच आणखी आनंदोत्सव साजरा झाला.

टॅग्स :laturलातूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस