शनिवारी सायंकाळी मूर्तीचे पूजन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. रविवारी सकाळी मूर्तीची विधिवत पूजा करून मुख्याधिकारी भारत राठोड व सुमन राठोड यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प.पू. काशीनाथ नारकर महाराज यांनी सकारात्मक जगायला शिकलो तर जीवन सफल होईल, अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती येईल. संघर्ष पेलण्याची ताकद मिळेल. जगणे सुंदर होईल, असा संदेश दिला.
प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी व गंगाधर गोसावी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास हैदराबादचे निवृत्त प्राचार्य सुरेश कुलकर्णी, जि. प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, उदगीर शहर ठाण्याचे पो.नि. गोरख दिवे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मयूर कुलकर्णी, सुनंदा सरदार, भालचंद्र कुडलीकर, स्नेहा कुडलीकर, संदीप कुलकर्णी, राम भोसले, विठ्ठल सूर्यवंशी, विष्णू संपते, राम बोंबिले, सचिन सूर्यवंशी, गणेश चव्हाण, बाबू राठोड, संदीप सूर्यवंशी, श्रीधर नेलवाडे यांनी पुढाकार घेतला.