शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

योग्यवेळी श्रवण तपासणीने दुष्परिणाम रोखता येतात : डॉ. तुषार वनसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:06 IST

शालेय विद्यार्थ्यांना सर्दी, घश्याचे संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो तर वृद्धांमध्ये वयोमानानुसार श्रवण क्षमतेचा ऱ्हास होतो. 

उदगीर (लातूर ) : बहिरेपणामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्यवेळी श्रवण क्षमता तपासणी करावी, असे मत श्रवणशास्त्रज्ञ, भाषा-वाचा विकारतज्ज्ञ डॉ. तुषार वनसागर यांनी मांडले. 

प्रत्येक बाळाची श्रवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. एक हजार बाळ जन्मदर गृहीत धरला तर त्यात ५ ते ६ बाळ जन्मत: बहिरे असतात, असा निष्कर्ष निघाला आहे. गर्भवती मातेच्या कुपोषणामुळे जन्मजात बहिरेपणा येतो. गर्भाची अपुरी वाढ, नात्यात विवाह होणे, आनुवंशिकता, जन्मानंतर होणारा कावीळ, डोक्यात ताप चढणे, बाळाचे जन्माच्या वेळी वजन कमी ही ज्ञात कारणे आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सर्दी, घश्याचे संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो तर वृद्धांमध्ये वयोमानानुसार श्रवण क्षमतेचा ऱ्हास होतो. 

डॉ. वनसागर म्हणाले, तपासणीनंतर श्रवण ऱ्हास तीन प्रकारात वर्गीकृत केला जातो. कानाचा पडदा किंवा हाडाच्या साखळीला इजा असणे, कानाच्या नसची क्षमता कमी झाल्यामुळे, आवाज वाहून नेण्याची क्षमता मंदावणे किंवा वरील दोन प्रकार एकत्र होऊन होतो. पडद्याला इजा किंवा हाडाच्या साखळीला इजा झाली तर वैद्यकीय उपचार वा शस्त्रक्रिया करता येते. कानाची नस क्षमता कमी असेल तर बहिरेपणाच्या तीव्रतेनुसार श्रवण यंत्र बसविता येते. विविध तांत्रिक यंत्राद्वारे कानाची श्रवण क्षमता तपासणी करता येते. जे बाळ ऐकू शकते तेच बोलू शकतात. जन्मत: बहिरे असलेल्या बाळाच्या श्रवण क्षमतेनुसार दोन्ही कानांना श्रवणयंत्र बसविले जाते. त्यानंतर त्याला वाचा-भाषा उपचार दिले जातात. आवाज ऐकणे आणि बोलणे याचे प्रशिक्षण दिले जाते. सुधारणा न दिसल्यास नुकतंच विकसित झालेले प्रगत तंत्रज्ञान कॉक्लिर इंप्लान्ट करण्याचा सल्ला दिला जातो. जन्म झालेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत ऐकण्यात कमीपणा जाणवला तर योग्य वेळी श्रवण तपासणी करून केलेला उपचार महत्त्वाचा ठरतो.

श्रवण क्षमता तपासणी...जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ३ मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित केला आहे. जगात कोट्यवधी लोक कर्णबधिर आहेत. अविकसित आणि विकसनशील देशात कर्णबधिरपणा तपासणी आणि तंत्रज्ञान याबाबत सामान्यजन अनभिज्ञ आहेत. यासंदर्भात जनजागरण होण्यासाठी यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘श्रवण क्षमता तपासणी’ हे ध्येय घेऊन प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य