शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बीदरच्या आरक्षित कोट्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय; जागा मिळत नसल्याने ओरड  

By आशपाक पठाण | Updated: January 20, 2024 19:08 IST

लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला.

लातूर: लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला. आठवड्यातील तीन दिवस ही रेल्वे बीदरपर्यंत जात असल्याने लातूरच्या प्रवाशांना जागा मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली. रेल्वेच्या विस्ताराबरोबरच दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीत आरक्षित ८६५ जागांपैकी ७८० जागांचा रिमोट कोटा बीदरला अन् लातूरसाठी केवळ ८५ जागा आरक्षित ठेवल्या. यातून प्रवाशांची कोंडी होत आहे.

लातूरकरांची मदर ट्रेन असलेली लातूर ते मुंबई रेल्वे सुरळीतपणे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही २५ एप्रिल २०१७ मध्ये ही गाडी बीदरपर्यंत नेण्यात आली. तेव्हापासून या गाडीत लातूरकरांना जागा मिळणे कठीण झाले आहे. आरक्षित रिमोट कोटा लातूरला देणे अपेक्षित असताना दक्षिण मध्य रेल्वेने बीदरला कोटा वाढवून तेथील प्रवाशांची सोय केली. इथे मात्र, लातूर, धाराशिव, बार्शीच्या प्रवाशांना जागाच मिळत नसल्याने इतर वाहनांचा आधार घेण्याची वेळ आली. बीदरचा रिमोट कोटा जनरल केल्यावर प्रवाशांची सोय होणार आहे, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जनरल कोट्यामुळे बीदर ते पुण्यापर्यंतच्या प्रवाशांना प्रथम बुकींग करणाऱ्यास सहजपणे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मुंबई ते बीदर स्वतंत्र रेल्वे हवी...लातूर ते मुंबई ही रेल्वे पूर्ववत करून सात दिवस लातुरातून सोडणे आवश्यक आहे. विस्तारित बीदर मार्गावर स्वतंत्रपणे नवीन गाडी सुरू केल्यास प्रवाशांची साेय होणार आहे. मागील सहा वर्षांपासून लातूरच्या प्रवाशांची परवड होत आहे. जागाच मिळत नसल्याने अनेकजण त्रस्त आहेत. मध्य रेल्वेने बीदर ते मुंबई रेल्वेला ज्याप्रमाणे तीनही दिवस जनरल कोटा केला आहे त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेने जनरल कोटा केल्यास सोय हाेणार आहे. - शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती.

प्रथम बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य...बिदरचा जो ७८० जागांचा आरक्षित रिमोट कोटा आहे तो जनरल कोट्यात रूपांतरीत केल्यास बीदरपासून बार्शीपर्यंत कुणालाही सहजपणे तिकिट मिळेल. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने कोटा बदलासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे