शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यातील बहुतांश गावांची तहान भागवणारा व पिकांसाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५.३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यात पाण्याचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. दररोज ४ एमएमने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, तीन महिन्यांत जवळपास ९.५० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. वर्षभरापूर्वी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. अर्ध्या तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १५.३५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्प पावसाळ्यात भरत नाही. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परंतु, यंदा पावसाळ्यातही नाही आणि परतीच्या पावसातही प्रकल्पात एक थेंबही जलसाठा झालेला नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रेणात जलसाठा झालाच नाही. त्यामुळे तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेसच्या पात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने या तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत.

प्रकल्पात ४.२८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...उपयुक्त पाणीसाठा ४.२८५ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१५६ दलघमी असून, पाण्याची टक्केवारी १५.३५ टक्के आहे. तीन महिन्यांत ९.५० टक्के जलसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्केवारी होती. तीन महिन्यांत जवळपास साडेनऊ टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पात १५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीपुरवठा योजना आहेत त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन होत आहे. धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी बंदची कार्यवाही करण्यात आली असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पाणी नाहीच...रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रेणा धरण निर्मितीसाठी जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, कामखेडा, घनसरगाव, रेणापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यावर विविध पिकांची लागवड केली. मात्र, आता हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी