जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे...
लातूर - यशवंतपूर
लातूर - मुंबई
हैदराबाद - पुणे
अमरावती पुणे
नांदेड -पनवेल
निर्र्णयाची प्रतीक्षा...
लातूर स्थानकावर येणाऱ्या आणि लातूरहून इतर ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे बंद आहेत. सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावरुन निर्णय होईल. त्यानंतरच अंमलबजावणी केली जाईल.
- बी.के.तिवारी, स्टेशन प्रबंधक, लातूर
रेल्वे कधी सुरु होणार...
कोरोनामुळे लातूरची रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे इतर शहराला जाण्यासाठी एसटी बस किंवा ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे.
लातूर-मुंबई रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद सर्वाधिक असतो. मात्र, सध्या सदर रेल्वे ही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
लातूर-यशवंतपूर, लातूर--मुंबई, हैदराबाद-पुणे, अमरावती पुणे आदी रेल्वे लातूर रेल्वेस्थानकावरून धावतात. मात्र, सध्या या रेल्वे बंद आहेत.
रेल्वे कधी सुरु होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
मुंबई रेल्वेला पसंती...
जिल्ह्यातून मुंबईला जाणारे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बस ऐवजी रेल्वेला पसंती देतात. रात्री १०.३० वाजता रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी पहावयास मिळायची. मात्र, सध्या रेल्वेच बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना इतर साधनांचा आधार घ्यावा लागत आहे.
स्थानकावर शुकशुकाट...
सध्या लातूर रेल्वेस्थानकावरून एकही रेल्वे सुरु नाही. त्यामुळे स्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. दरम्यान, तत्काळ रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.