शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 20:16 IST

मांजराच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात अतिवृष्टी

लातूर : पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने लातूर शहरासाठीच नव्हे तर अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा प्रकल्पात गेल्या तीन तासांत ११ सेंटिमीटरने पाणी वाढले आहे. मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे.

लातूर शहराचा पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच लातूरला भरपूर पाणी मिळते अन्यथा टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पावसाकडे लातूरकरांची नजर आहे. धरण कधी भरते याकडे लक्ष लागले आहे. पाटोदा महसूल मंडळात ज्या ठिकाणी मांजरा नदीचा उगम आहे. या तालुक्यातील उगलेवाडी येथून नदीला सुरुवात होते. याच परिसरात शनिवारी सकाळी ७२ मि.मी. पाऊस झाला. या पावसाचे पाणी मांजरा प्रकल्पात यायला तब्बल १२ तास उलटले. तरी धनेगावपासूनवर असलेले महासांगवी आणि संगमेश्वर हे दोन्हीही मध्यम प्रकल्प भरले असल्यामुळे पाणी लवकर आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात २२.७९ दलघमी नवीन पाणीमांजरा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत ५९० मि. मी. पाऊस झाला आहे. यामुळे यंदा मांजरा प्रकल्पात २२.७९ दलघमी नव्याने पाणी आले आहे. सध्या प्रकल्पात नव्या आणि जुने पाणी मिळून ६३.४३९ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभापासून पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याचा संचय हळूहळू झालेला आहे. शनिवारी पाटोदा परिसरात अतिवृष्टी झाल्याने एकाच दिवशी अकरा सेंटिमीटरने पाणी वाढले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण भरेल, अशी अपेक्षा आहे.

दिवसभरात रविवारी असे वाढले पाणीरविवारी सकाळी सहा वाजल्यापासून दर तीन तासाला पाण्याची टक्केवारी, पातळी मोजण्यात आली. त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प क्षेत्रातील पाऊस ओसरला असल्यामुळे दुपारनंतर पाण्याचा येवा कमी झालेला आहे. सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत जिवंत पाण्याची टक्केवारी १२ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दर तीन तासाला मोजमापसहा वाजता : ७.५ %बारा वाजता : ८.१३तीन : ९.२२ %प्रकल्पातील पाण्याची स्थितीएकूण पाणीसाठा : ६४.४३९ दलघमीमृतसाठा : ४७.१३० दलघमीजिवंत पाणीसाठा :१६.३०९ दलघमीजिवंत पाण्याची टक्केवारी : ९:२२ टक्के

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरण