शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लगीनसराईत साेने झळाळणार; वर्षभरात तिसऱ्यांदा साेन्याने ओलांडला ६२ हजारांचा दर !

By राजकुमार जोंधळे | Updated: November 28, 2023 16:12 IST

यंदाच्या लग्नसराईत साेन्याचा हाच दर ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे

लातूर : सध्या इस्रायल-हमासदरम्यान शस्त्रविराम सुरू आहे. परिणामी, साेन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. ५५ हजारांवर घसरण झालेल्या साेन्याने प्रतिताेळा ६३ हजारांवर उसळी मारली आहे. चांदीही चकाकली असून, यंदाच्या लग्नसराईत साेन्याचा हाच दर ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज लातुरातील काही सराफा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. तुलसी विवाहानंतर लग्नसाेहळ्यांची सध्याला धामधूम सुरू झाली आहे. त्यातच साेन्या-चांदीने भाव खायला सुरुवात केली आहे.

गत चार महिन्यांच्या काळात साेन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गत वर्षभरात साेन्याने तिसऱ्यांदा प्रतिताेळा ६२ हजारांचा दर ओलांडला आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, साेमवारी आणि मंगळवारी लातुरातील सराफा बाजारात २४ कॅरेट साेने ६२ हजार ३९९ रुपयांवर पाेहोचला आहे. तर तीन टक्के जीएसटीसह हा दर ६४ हजार १६९ रुपयांवर हे पोहचला असून चांदी जीएसटीसह ७७ हजारावर पोहचला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा साेने ६२ हजारांच्या घरात गेले होते. हा सर्वांत उच्चांकी दर हाेता. त्यानंतर सतत घसरण झाली अन् ती ५५ हजारांवर आली. गत महिनाभरात ५९ ते ६० हजारांवर दर स्थिरावला. मात्र, गत आठवड्यात अचानकपणे साेन्याने उसळी घेतली आहे.

युद्धकाळात दरात घसरण...इस्रायय-हमासदरम्यान सध्या शस्त्रविराम आहे. यातूनच साेन्या-चांदीच्या बाजारात माेठी उलाढाल सुरू झाली. युद्धादरम्यान हेच दर माेठ्या प्रमाणावर घसरले. युद्धाचा परिणाम झाला, सध्या युद्ध थांबल्याने पुन्हा साेन्या-चांदीच्या उलाढालीत वाढ झाली. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाचा कालावधी वाढविण्याची मागणी वाढत आहे. शस्त्रविराम कालावधी वाढला नाही तर दरात चढ-उतार हाेईल.

इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम..?साेन्याच्या दरात यंदा माेठ्या प्रमाणावर चढ-उतार हाेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाेणाऱ्या घडामाेडी आणि इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम साेन्या-चांदीच्या उलाढालीवर, दरावर झाला आहे. यंदाच्या लगीनसराईत साेने प्रतिताेळा ६५ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खरेदीला प्राधान्य...साेन्या-चांदीचे दर वधारत असल्याने अनेकांनी आतापासूनच साेन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. दिवसागणिक ५०० ते ८०० रुपयांची वाढ हाेत आहे. सध्याला प्रतिताेळ्याचा दर ६३ ते ६४ हजारांच्या घरात आहे. - सचिन शेंडे-पाटील, सराफा

दरात चढ-उतार...गत सहा महिन्यांपासून साेन्या-चांदीच्या दरात कायम चढ-उतार हाेत आहे. गत आठवड्यापासून अचानकपणे साेन्या-चांदीचे दर वाढले. परिणामी, अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदीला गर्दी केली आहे. - महेश शिंदे, बाकलीकर, सराफा

टॅग्स :laturलातूरGoldसोनंMarketबाजार