शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

लातूरात झेडपीचे अधिकारी-कर्मचारी रमले मैदानात; लगावले फोर अन् सिक्सर !

By राजकुमार जोंधळे | Updated: February 9, 2024 19:38 IST

या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉल-बॅडमिंटन, बॅडमिंटन व मैदानी खेळांचा समावेश असला तरी कर्मचाऱ्यांचा ओढा क्रिकेट खेळाकडे दिसला.

- महेश पाळणे

लातूर : दैनंदिन ऑफिस कामात व्यस्त असणारे जि. प.चे अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत रमलेले दिसले. निमित्त होते ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे. या स्पर्धेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाचा तर आनंद घेतलाच, यासोबतच क्रिकेट स्पर्धेतील चौकार-षटकारांच्या बरसातीवर संगीताच्या तालावर ठेका धरत नृत्याविष्कारही सादर केला. एकंदरीत, दिवसभर फायलींच्या कामात असणारे हे कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विरंगुळा जपताना दिसले.

जिल्हा क्रीडा संकुलात शुक्रवारपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. अनेक सांघिक व वैयक्तिक खेळप्रकारात या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. जवळपास हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध खेळांत आपले कौशल्यपणाला लावलेले दिसले. वर्षभर कामाच्या व्यापात असणाऱ्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

क्रिकेट खेळाकडेच ओढा...या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉल-बॅडमिंटन, बॅडमिंटन व मैदानी खेळांचा समावेश असला तरी कर्मचाऱ्यांचा ओढा क्रिकेट खेळाकडे दिसला. आपल्या संघाला चेअरअप करीत काही संघांनी तर छोटा डीजेच मैदानात आणला होता. चौकार, षट्कारांची बरसात होताच संगीताच्या तालावर ठेका धरत या कर्मचाऱ्यांनी आपल्या संघाचे मनोबल वाढविले.

पुंगी वाजवून केली चेअरिंग...व्हॉलिबॉलसह खो खो, कबड्डीच्या मैदानावरही चेअरिंग दिसून आली. विशेषत: आपल्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर गुण घेतले की, पुंगी वाजवून आपल्या संघाला प्रोत्साहन दिले. यात पुरुषांसह महिला खेळाडू कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

निलंगा राईस व लातुरी वडापावचा आवाज घुमला...व्हॉलिबॉल सामन्यात पंचायत समिती लातूरविरुद्ध निलंगा हा सामना रंगला होता. यात प्रेक्षकांनी आपल्या संघाचे मनोबल वाढविण्यासाठी इस्ट और वेस्ट.. निलंगा राईस इज द बेस्ट... यासह एकच फाईट.. लातूरचा वडापाव टाईट... अशा घोषणा देत स्पर्धेत उत्साह आणला.

कोरोनानंतर तीन वर्षांनी स्पर्धा...२०१९-२० वर्षात जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्पर्धा झाली होती. त्यानंतर कोरोना आला. त्यामुळे स्पर्धा झाली नाही. त्यानंतर आता तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा होत असल्याने जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांत उत्साह होता. विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपले बळ पणाला लावून खेळण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. एकंदरित, या स्पर्धेत कर्मचाऱ्यांनी सांघिक भावना दाखवत खेळाचा आनंद लुटला.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद