शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजारातून मुक्त मातेस ६ वर्षांनी आठवली मुलगी अन् घर; अखेर चिमुकलीची झाली भेट

By संदीप शिंदे | Updated: May 27, 2023 20:14 IST

चिमुकली २२ दिवसांची असताना आईस मानसिक आजार जडला, अखेर मातृछत्र सहा वर्षांनी भेटले

लातूर : मानसिक आजारामुळे घरापासून दुरावलेल्या एका महिलेला सहा वर्षांनंतर बरे झाल्यावर आपल्याला लहान मुलगी होती हे पहिल्यांदा आठवले. तिच्यातील मातृत्वाने आजारावर विजय मिळवित मुलगी, कुटुंबीय, घर-गावही ध्यानी आले. मुलगी २२ दिवसांची असताना बाहेर पडलेली आई सहा वर्षांनी कन्येसमोर आली अन् तिला मातृछत्र मिळाले.

जानेवारी २०२३ मध्ये लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातून सहायक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशनचे राहुल पाटील यांना संपर्क करून मानसिक आजारी स्थितीत असलेल्या महिलेची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महिलेला बुलढाणा येथील अशोक काकडे यांच्या दिव्य सेवा प्रकल्पात पाठविले. तिथे तिच्यावर विनामूल्य उपचार झाले. ती बरी झाली. त्यानंतर तिने स्वत:चे नाव सुरेखा सांगितले. तिला लहान मुलगी असल्याचे आठवले. मूळची नांदेड येथील व सासर पंढरपूर असल्याचे तिने सांगितले. अशोक काकडे यांनी उपचारानंतर सुरेखा यांना घरी पोहोचविण्यासाठी लातूरच्या आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील, आकाश गायकवाड, आसिफ पठाण, मुस्तफा सय्यद, गोपाल ओझा यांच्याशी संवाद साधला. तेथून कुटुंबीयांचा शोध घेऊन कार्यकर्त्यांनी महिलेला घरापर्यंत पोहोचविले.

आई म्हणत...घट्ट मिठी मारली...२२ दिवसांची चिमुकली असताना आईचे घर सुटले. ती कुठे आहे, ती आता कशी दिसत असेल याची कसलीही कल्पना नाही. सहा वर्षांनंतर तिला कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबीयांनी जेव्हा सांगितले ही तुझी आई तेव्हा तिने आई म्हणत...घट्ट मिठी मारली. तत्पूर्वी लातूर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरेखा व त्यांच्या परिवाराची विचारपूस केली.

स्वच्छ भारत मिशन...कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन आहे. त्यात स्वत:चे भान हरवलेल्या अन् कचरा कुंडीसारख्या अस्वच्छ ठिकाणी निपचित पडलेल्या मनोरुग्णांना आधार देण्यासाठी, अशा रुग्णांना स्वच्छ भारत मिशनमध्ये मदत करावी, अशी मागणी आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFamilyपरिवार