शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काेयता बाळगणारा सराईत गुंड ‘एमपीडीए’खाली लातूर कारागृहात स्थानबद्ध

By राजकुमार जोंधळे | Updated: January 27, 2024 19:00 IST

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही पाचवी कारवाई आहे.

लातूर : काेयता बाळगणाऱ्या सराईत गुंडाला ‘एमपीडीए’खाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही पाचवी कारवाई आहे. या सराईत गुन्हेगाराकडून सार्वजनिक शांततेला धाेका असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला राेखण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार पवन सहदेव जाधव (वय २१, रा. संजयनगर, औसा ह. मु. म्हाडा कॉलनी, लातूर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पवन जाधव याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाच्या पाच गुन्ह्यांची नोंद असून, त्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून भीती दाखवणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव जमा करून दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र वापरणे, चोरी करणे, आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, विश्वंभर पल्लेवाड, पोलिस उपनिरीक्षक अमर केंद्रे, संतोष खांडेकर, सुधीर साळुंखे, बहादूर सय्यद, रमेश नामदास, पांडुरंग सागरे यांनी ‘एमपीडीए’नुसार प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीला पाठविला होता. जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तो मंजूर केला असून, त्याची लातूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे एमपीडीए कायदा?महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ, पायरसी) वाळूतस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा सन १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज) होय. सराईत गुन्हेगार, सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी