शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: July 12, 2023 20:05 IST

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफेंवर एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई...

लातूर : शहरातील विविध भागात असलेल्या काॅफी शाॅप आणि कॅफेवर पाेलिस पथकांनी छापे मारले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ कॅफेचालकांविराेधात विविध पाेलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने काॅफी शाॅप, कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहे.

लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि हॉटेलबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्यानुसार लातूर पोलिसांकडून वेळोवेळी कॉफी शॉप, हॉटेलवर छापे मारण्यात आले. मात्र, काॅफी चालकांवर निर्बंध नसल्याने, कॅफे आणि हॉटेलमध्ये निमयबाह्य गाेष्टींना चालना मिळेल, अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी, कॉफी शॉप अन हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा वावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला होता. ठराविक कालावधीसाठी काॅफी शाॅप, कॅफे, हाॅटेलचालक शुल्क आकारून नकाे त्या बाबींना चालना देत असल्याचे समाेर आले. यातून कॉफी शॉप, हॉटेलमध्ये युवक-युवती अन अल्पवयीन मुले-मुली तासन्तास बसून चुकीचे वर्तन करत असल्याचे आढळून आले. अशा काॅफी शाॅप, कॅफे आणि हाॅटेलवर पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पाेलिस पथकांनी लातूरसह जिल्ह्यातील २४ काॅफी शाॅप, कॅफेवर एकाचवेळी छापे मारले. याबाबत विविध पाेलिस ठाण्यांत २४ काॅफी शाॅप, कॅफेचालकांविराेधात गुन्हे दाखल केले आहेत.

एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई...पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, दामिनी पथकातील अधिकारी, अंमलदारांनी एकाचवेळी विशेष तपासणी मोहीम राबविली.

काॅफी शाॅपचालकांना पाेलिस पथकाचा दणका...कॉफी शॉप, कॅफेचालकांना पाेलिसांनी दणका दिला असून, २४ जणांविराेधात कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवाजीनगर ठाण्यात १५ गुन्हे, एमआयडीसी ठाण्यात २, गांधी चौक ठाण्यात २, दामिनी पथकाकडून २, अहमदपूर ठाण्यात २ आणि उदगीर शहर ठाण्यात १ गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर