शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या न्यू काझी मोहल्ला परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा; कारणांचा मनपाला शोध लागेना

By हणमंत गायकवाड | Updated: January 8, 2024 18:27 IST

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

लातूर: शहरातील न्यू काझी मोहल्ला परिसरातील रुखय्या बेगम हायस्कूल रोड परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही की अशुद्ध पाणीपुरवठा कशामुळे होत आहे, याबाबतचे कारण शोधले जात नाही. नागरिकांना मात्र अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अभियंता तसेच विद्यमान अभियंतांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिलेले आहे. दरम्यान, उपायुक्त मयुरा शेंद्रेकर यांची या भागातील नागरिकांनी भेट घेऊन अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. याबाबत उपायुक्त शेंद्रेकर यांनी या भागातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, त्यांनी त्यांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांची बैठकही बोलवली आहे.

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा.....पाणी सोडणारे लाइनमन, जलकुंभ प्रमुख, शाखा अभियंता तसेच पाणीपुरवठा अभियंतांकडे निवेदनाद्वारे समस्या सोडविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. आठ दिवसांमध्ये शुद्ध पाणी नळाला द्यावे अन्यथा मनपा आयुक्त, पाणीपुरवठा अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी अर्बन सेल व स्थानिक कलीम अ.रहेमान उस्ताद यांच्या वतीने मनपा प्रशासनाला दिला आहे.

नागरिकांच्या वतीने उपायुक्तांना निवेदन.....निवेदनावर कलीम अ. रहेमान उस्ताद, जाकीर तांबोळी, डी. उमाकांत, शेख वसीम अक्रम खय्युम, इरफान रशीद पठाण, महेबुब खान, सफीउल्ला खान, शेख रसुलसाब, शेख बाबूसाब, शेख इब्राहिम नजीरमिया, शेख रोशन, शेख रफीक, शेख फारुख, अब्दुल सत्तार, शेख इमरोज, शेख मिनहाज, इरफान रज्जाक, राज मणियार यांच्यासह अनेक महिलांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत.

समस्या असेल तर तत्काळ उपाययोजनासगळीकडे शुद्ध पाणीपुरवठा आहे. न्यू काझी मोहल्ला परिसरातही शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. तरीही काही समस्या असतील तर त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.- विजयकुमार चव्हाण कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, लातूर मनपा

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी