शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले; पाच महिन्यात १ हजार ७४६ गुन्हे दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: April 20, 2023 17:49 IST

लातूर पोलिसांचा हिसका; सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

लातूर : जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांना झटका देत लातूर पोलिसांनी गत पाच महिन्यात विविध पोलिस ठाण्यात तब्बल १ हजार ७४६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २० ऑक्टोबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारला. तर गत पाच महिन्यात त्यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली. दरम्यान, अवैध व्यवसायाची माहिती थेट आपल्या मोबाईलवर, व्हाट्सएपवर द्या, असे नागरिकांना जाहीर आवाहन केले. त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबरच नागरिकांना देऊन टाकला. यातून प्राप्त तक्रारी, माहितीच्या आधारे तातडीने विशेष पथकांनी अवैध व्यवसायावर छापा टाकला आहे. ही कारवाई मार्चअखेरची असून, जिल्ह्यातील विविध २३ पोलीस ठाण्यात तब्बल दोन हजार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत २ कोटी ९ लाख ८२ हजार २७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

असे आहेत विविधस्वरूपाचे गुन्हे दाखल ...गत पाच महिन्याच्या कालावधीत दारूबंदी कायद्याअंतर्गत १ हजार ३६१ गुन्हे, जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत ३४९ गुन्हे, प्रतिबंधित गुटखा विक्री व्यवसाय अंतर्गत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्रार करणाऱ्याचे नाव ठवले जाते गोपनीय..पोलिस अधीक्षक मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी स्वतःचा खाजगी मोबाईल क्रमांक जाहीर केला. या मोबाईल क्रमांकावर अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. मिळालेल्या महितीनंतर तातडीने छापा मारला जातो. 

५४ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई...वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावरही तोडगा काढत पोलीस अधीक्षकांनी वाहन चालकांमध्ये वाहतूक जनजागृती केली. वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५३ हजार ९७१ वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करत १ कोटी २१ लाख १० हजार ६९० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर