शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा जाळाल तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार

By हणमंत गायकवाड | Updated: December 29, 2023 19:38 IST

लातूरात सहा महिन्यात २६ जणांवर कारवाई: २९ हजार रुपयांचा दंड वसूल

लातूर : लातूर शहरामध्ये दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत असले तरी उघड्यावर कचरा जळण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. त्या विरोधात महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोहीम राबविली असून गेल्या सहा महिन्यात २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही पुन्हा कचरा जाळला तर आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या स्वच्छता विभागाचे पथक कार्यरत झाले आहे.

महानगरपालिकेकडून दररोज घंटागाडीद्वारे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो. दोन्ही मिळून दीडशे ते साडेतीनशे टन कचरा संकलित होतो. तरीही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. विशेष करून खाजगी आस्थापनांच्या मालकांकडून कचरा जाळण्याच्या घटना घडतात. त्यावर आता महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाची नजर राहणार आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला, त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असे महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी सांगितले.

कचरा पेटविल्याने मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे...ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद आहे. असे असले तरी अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. आतापर्यंत कचरा पेटविल्याने कित्येक मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे आहेत. गोदामांना आग, उद्यानांना आग, भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना अशा निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मनपाचा विचार आहे. प्रारंभी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

उघड्यावर कचरा पेटविणे कायद्यानुसार गुन्हा...उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हवा प्रदूषित होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे.

फौजदारी गुन्हे दाखल होणारगेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला. त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. आता वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. -रमाकांत पिडगे, स्वच्छता विभाग प्रमुख, लातूर मनपा

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न