शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरफाेडीतील आराेपी जाळ्यात; चाैकशीत नऊ गुन्ह्यांचा उलगडा

By राजकुमार जोंधळे | Updated: June 28, 2025 21:41 IST

स्थागुशाची कारवाई : दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

राजकुमार जाेंधळे, लातूर: घरफोडीतील एका आराेपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीमध्ये एकूण नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, काही दिवसांपासून लातूर शहरात वेगवेगळ्या दुकानांचे रात्री पत्रे कापून, कडीकोंडा तोडून रोकड, मोबाईल पळविल्याल्या घटना घडल्या हाेत्या. दरम्यान, याबाबत शिवाजीनगर आणि एमआयडीसी ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील आराेपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपीचा शाेध सुरू केला. आराेपींचा माग काढताना खबऱ्याने माहिती दिली. याची खातरजमा केली असता, रेणापूर नाका परिसरात पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेत कसून चाैकशी केली असता, दिनेश महादेव टेकाळे उर्फ शंकर दत्तात्रय पांचाळ (वय २९ रा. हरिभाऊनगर, कृपासदनरोड, लातूर) असे त्याने नाव सांगितले.

माेबाइल, राेकड, पक्कड, कटर जप्त...

लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरलेले मोबाइल, रोख रक्कम, हॅन्डग्लोज, पक्कड, कटर, लोखंडी टामी असे साहित्य त्याच्याकडून जप्त केले. शिवाय, स्थागुशाच्या पथकाने उदगीर येथे कारवाई करत गुन्ह्यात चोरलेले दोन मोबाइलही जप्त केले. चाैकशीमध्ये घरफोडी, चोरीच्या ९ गुन्ह्यांचा उलगडा करून, पाेलिसांनी १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूरसह उदगीर शहरामध्ये घरफाेडी, चाेरी केल्याचे उघड...

अटक केलेल्या चाेरट्याने लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीरमध्येही घरफाेड्यासह इतर चाेऱ्या केल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, पोलिस अमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, गणेश साठे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी