ताे गुन्हाच आहे...
साेशल मीडियावर अनेक जण शस्त्रे हातात घेऊन छायाचित्र व्हायरल करत आहेत. तलवारीने केक कापणे हाही गुन्हाच आहे. व्हायरल हाेणारे फाेटाे, पाेस्टवर सायबरची करडी नजर आहे. या प्रकरणी गत अडीच वर्षांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
- सूरज गायकवाड, सायबर सेल, लातूर
तलवारीने केक कापण्याची झाली फॅशन...
मित्रमंडळींमध्ये एखाद्याचा वाढदिवस माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. मात्र, ताे साजरा करताना अनेक जण केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करतात. त्याचबराेबर तलवारी हातात घेऊन नाचतात. याचे व्हिडीओ तयार केले जातात, फाेटाे काढले जातात आणि साेशल मीडियावर व्हायरल केले जातात. सध्याला ही फॅशन बनली आहे मात्र हा गुन्हा आहे.
कट्टा, तलवार आणि चाकू...
१ नव्यानेच तारुण्यात आलेल्या अनेकांच्या हाती बंदूक, तलवार, चाकू दिसून येत आहे.
२ शस्त्रास्त्रे हातात घेऊन ते फाेटाे, व्हिडीओ साेशल मीडियात व्हायरल केले जात आहेत.
३ यातून नागरिकांत दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचे समाेर आले आहे.
४ आता अशी फॅशन करणाऱ्या तरुणांवर पाेलिसांची नजर आहे.
लाइक करणारेही येणार अडचणीत...
साेशल मीडियावर दादागिरी, भाईगिरी करणाऱ्या तरुणांच्या पाेस्टला लाइक आणि त्यावर कमेंट करणारेही आता अडचणीत येणार आहेत. पाेलिसांनी अशा व्यक्तींना सहआराेपी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आता यापुढे अशा आक्षेपार्ह पाेस्ट, फाेटाेला लाइक किंवा कमेंट करताना खबरदारी घेण्याची गरज आहे.