शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनधारकांना झटका; ५३८९ चालकांकडून ३२ लाखांचा दंड वसूल

By राजकुमार जोंधळे | Updated: March 1, 2023 18:55 IST

वाहनांवर यापूर्वी ऑनलाइन दंड करण्यात आले असून, ज्यांनी दंड भरला नाही, अशांना वारंवार नाेटीस, एसएमएस पाठविण्यात आले हाेते.

लातूर : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या १ हजार ६०० वाहनधारकांना चांगला झटका दिला आहे. पाेलिसांनी फेब्रुवारीमध्ये तब्बल ११ लाख ६८ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यांच्याकडे पूर्वीचा दंड थकला आहे, अशा तब्बल ५ हजार ३८९ चालकांकडून ३१ लाख २९ हजारांचा दंड वसूल केला आहे.

लातूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्यांमुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. त्यांना शिस्त लावण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जात आहे. वाहतुकीचे नियम माेडणे अनेकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. लातुरात सण-उत्सव आणि विद्यार्थांच्या परीक्षा काळात वाहतुकीची काेंडी हाेत असल्याचे समाेर आले आहे. लातुरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. शहरात वाहतुकीचा खोळंबा हाेणार नाही, यासाठी पाेलिसांकडून चौकामध्ये पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

केंद्रीय माेटार वाहन कायद्यानुसार कारवाई...केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. चालक परवाना, वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत. शिवाय, वाहन चालविण्याचा परवाना, कागदपत्र सोबत न ठेवणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणे, मोबाईलवर बाेलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

१५४१ वाहनांवर खटले; १२ लाखांचा केला दंड...वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोउपनि. आयुब शेख, आवेज काझी यांच्यासह पथकाने फेब्रुवारी महिन्यात अवैध प्रवासी वाहतूक, सायलेन्सर, कर्कश हॉर्न, काळी-पिवळी टॅक्सी, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशा, नो पार्किंग, मोठ्या आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर असलेल्या तब्बल १५४१ चालकांवर खटले दाखल केले असून, त्यांना ११ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा दंड केला आहे.

दंडाची रक्कम न भरणाऱ्यांवर कारवाई...वाहनांवर यापूर्वी ऑनलाइन दंड करण्यात आले असून, ज्यांनी दंड भरला नाही, अशांना वारंवार नाेटीस, एसएमएस पाठविण्यात आले हाेते. दरम्यान, ज्यांनी दंड भरला नाही, अशांवर कारवाई केली जात आहे. ५ हजार ३८९ चालकांकडे थकलेला ३१ लाख २९ हजारांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर