शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2023 18:41 IST

औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता.

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. तगरखेडा येथील शेतकऱ्याचा दिवसभर उन्हामध्ये काम केल्याने उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली.

साेमवारी सायंकाळी शेतकरी पांडुरंग रामराव मुळजे (वय ६५, रा. तगरखेडा ता. निलंगा) हे शेतात अवकाळी पावसाने ज्वारीचे नुकसान झाले हाेते. पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने जागेवर असलेला पशुधनांचा चारा गाेळा करावा म्हणून ते दुपारपर्यंत शेतात कडबा गाेळा केला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका पाहुण्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन ते तगरखेडा येथील घरी आले. अंघाेळ करून बाहेर येतानाच त्यांना अचानक चक्कर आली, त्यानंतर उल्टी झाली. शिवाय, डाेक्याला तापही चढला. यावेळी त्यांना उपचारासाठी दाखल केले असता, उष्मघाताने मृत्यू झाल्याचे डाॅ. डी. एम. कदम यांनी सांगितले.

औराद परिसरात पारा पाेहोचला ४३ अंशांवर...औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता. काही दिवस ढगाळ वातावरणाने तापमानात उच्चांकी तर कधी वादळ-वारा आणि पावसामुळे तापमानात चढउतार हाेत आहे. गत दाेन दिवसांपासून पुन्हा तापमानाचा पारा वाढला आहे. साेमवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४१ अंश तापमानाची नाेंद झाली आहे.

भरदुपारी उन्हामध्ये घराबाहेर पडू नका...सध्याला दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, अंगाची लाहीलाही हाेत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, शक्यताे भरदुपारी उन्हात घराबाहेर पडू नये, पांढरा कपडा डाेक्यावर वापरावा, शेतकऱ्यांनी शेतातील कामे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात करावीत.  - अनूप पाटील, तहसीलदार, निलंगा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर