दयानंद माजी विद्यार्थी फाउंडेशन लातूरचे संस्थापक मुंबई उच्च न्यायालय महाप्रबंधक शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून दयानंद माजी विद्यार्थी फाउंडेशन विविध समाजोपयोगी उपक्रम उपक्रम राबवत असतात. असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम मिट टू टीचर राबविला जात आहे. यामध्ये माजी प्राचार्य तुळबा सर, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दुबे सर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी-शिक्षकातील नाते दृढ करत आहेत. इतक्या वर्षानंतरही विद्यार्थी ऑनलाइन भेटत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत. हरियाणा, मध्य प्रदेश ओरिसा, तेलंगणा या राज्यातून तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, बारामती, उस्मानाबाद, अहमदपूर, बीड या शहरातून विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी होत आहेत. त्यातून एक नवीन अनुभूती आणि निखळ आनंद सर्वजण घेत आहेत. सदर उपक्रमात आतापर्यंत सहभागी, प्राध्यापक, विद्यार्थी यांना दर रविवारी होणाऱ्या या उपक्रमाची ओढ निर्माण झाल्याचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात दिसून येत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद माजी विद्यार्थी फाउंडेशनचे संस्थापक सदस्य शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी सर्व तांत्रिक बाबी सांभाळून कार्यक्रम यशस्वी करत आहेत. सदर उपक्रमास मुंबई उच्च न्यायालय महाप्रबंधक शिवकुमार डिगे, श्रीमंत कावळे, उमाकांत आग्रे, धनंजय सवणे, राम सगरे, विजय किलचे, अब्दुला पठाण, रियाज पठाण, नागभूषण कुलकर्णी, पी.के. इंगळे, प्रशांत गोविंदपूरकर, मल्लिकार्जुन ठोंबरे, संतोष टाकणे, शेषेराव सूर्यवंशी, अनिता साखरे, वर्षा वेदपाठक, अनिता मोरे, वैशाली महिंद्रकर, खर्डेकर हणमंत गायकवाड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख युवराज सारणीकर परिश्रम घेत आहेत.
कोरोनाच्या काळात माजी विद्यार्थ्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST