शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्याची अनोखी किमया; काका पवारांचा पठ्या राहुल आवारेलाही अर्जुन पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:41 IST

तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय पुरस्काराची गुरू-शिष्याची हॅट्ट्रिक...संघर्षातुन मिळालेल्या यशाचा आनंद... 

- महेश पाळणे

लातूर : लातूरच्या मातीला कुस्ती खेळाचा सुंगध आहे. या मातीतून जन्मलेल्या दिग्गज मल्लानीं देशभरात अनेक आखाडे गाजविले. लातूरचे भूमिपुत्र असलेले अर्जुनवीर काका पवार यांच्या पाठोपाठ त्यांचा शिष्य राहुल आवारे यांनाही शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अर्जून पुरस्कार जाहीर केला. त्यामुळे मराठवाड्याची ही गुरु-शिष्याची जोडी हिट ठरली आहे. शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने विविध पुरस्कारांची घोषणा केली. यातील अर्जुन पुरस्कारांच्या यादीत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मराठवाड्याचा मल्ल राहुल आवारे यांचा समावेश आहे.

तब्बल ३१ वेळा आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कुस्तीत किमया करणारे काका पवार यांचा पठ्या राहुल आवारे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भीम पराक्रम करीत अनेक पदकांची लयलूट केली आहे. या जोरावर राज्य शासनाने त्यांची डीवायएसपी पदावर थेट नियुक्ती केली आहे. याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील असलेले राहुल आवारे यांनी कुस्तीत मराठवाड्याचे नाव रोशन केले आहे. या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

 केंद्रीय पुरस्काराची गुरू-शिष्याची हॅट्ट्रिक... लातूरचे रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार हे अर्जुनवीर काका पवार यांचे गुरू असून, त्यांना केंद्र शासनाने मेजर ध्यानचंद पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या पाठोपाठ शिष्य काका पवार यांना केंद्राचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तर त्यांचे शिष्य राहुल आवारे यांना नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून, मराठवाड्याच्या या गुरू-शिष्यानी केंद्राच्या सर्वोच्च पुरस्कारांची हॅट्ट्रिक केली आहे. 

संघर्षातुन मिळालेल्या यशाचा आनंद... पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद वाटला. प्रामाणिकपणे मेहनत केल्याचे हे फळ आहे. नियमाने हा पुरस्कार मला पूर्वीच मिळायला हवा होता. मात्र, आता डबल पुरस्कार मिळाल्याचे मला जाणवत आहे. हरिश्चंद्र बिराजदार मामा, काका पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथंपर्यंत पोहोचलो, असे कुस्तीपटू राहुल आवारे यांनी सांगितले. 

कष्टाचे फळ मिळाल्याने आनंद...   राहुल हा मेहनती मल्ल आहे. आजपर्यंत त्याने कुस्तीत खूप मेहनत घेतली आहे. या कष्टाचे पुरस्काराच्या रूपाने फळ मिळाले असल्याचे अर्जुनवीर काका पवार यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती