लॉर्ड श्रीकृष्ण स्कूलमध्ये नागपंचमी साजरी
लातूर : येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण लाटे, समन्वयक रौफ शेख, शिक्षिका नम्रता झांबरे, रूपाली कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. श्रीकृष्ण लाटे, रौफ शेख यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नागपंचमी सणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
दयानंद कलामध्ये एकदिवसीय कार्यशाळा
लातूर : शहरातील दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाइन व ॲनिमेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझाइन व ॲनिमेशनमधील करिअर व अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. सुवर्णा लवंद, प्रा. दुर्गा शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस डॉ. ममता जोशी, रेखा माने, माधवी जोधवानी, अश्विनी संगेकर, अंजली चरखा, वर्षा बोरा, अंजली स्वामी आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
लाहोटी स्कूलमध्ये डिजिटल ग्रंथालय
लातूर : शहरातील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. एस आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य कर्नल एस. ए. वरदन, शिक्षक विनोद चव्हाण, वैशाली गुरव, देवयानी देशपांडे, प्रवीण शिवनगीकर, उपप्राचार्य विक्रम माने, मुख्याध्यापिका विद्या साळवे, कॅप्टन बी. के. भालेराव, स्नेहा गोमारे, संदीप केंद्रे, मनीषा वराडे, अशीद बनसोडे, प्रकाश जकोटिया, विवेक डोंगरे, ज्ञानेश्वर यादव, अकमल काझी आदींची उपस्थिती होती.
आरेफ शेख यांना पीएच.डी. प्रदान
लातूर : येथील प्रा. आरेफ पाशामियाँ शेख यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल डॉ. आर.डी. कांबळे, डॉ. आर.सी. जाधव, डॉ. दीपक ननावरे, डॉ. संदीप चव्हाण, रविकिरण गळगे, आसीफ शेख आदींनी त्यांचे कौतुक केले.