मातृभूमी विद्यालयात विज्ञान दिन साजरा
लातूर - तालुक्यातील भातांगळी येथील मातृभूमी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. नरेंद्र ढेले यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. निरामय मुचाटे, मुख्याध्यापक दोरवे, विज्ञान शिक्षक ढवळे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. मुचाटे यांनी प्रयोगातून विज्ञान व विज्ञानातून जीवन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ३४ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
क्रिकेट मॅचच्या कारणावरून मारहाण
लातूर - मागील पाच महिन्यांपूर्वी झालेल्या क्रिकेट मॅचचे कारणावरून शिवीगाळ करुन फिर्यादीच्या तोंडावर चापटा व डोक्यात आणि खांद्यावर काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना कल्पना चौक उदगीर येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी ताहेर रियाज शेख यांच्या तक्रारीवरुन जगजीत शिवाजी राठोड व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड करीत आहेत.