बाभळगाव येथे सामुदायिक आदरांजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेऊन, सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन केले होते. बुधवारी सकाळी स्मृतिस्थळी देशमुख कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वैशालीताई देशमुख, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, संतोष देशमुख, कल्याणकर, सुभाष जाधव, संभाजी सूळ, बिभीषण सांगवीकर, तानाजी सूर्यवंशी, प्रवीण सावंत, अविनाश बट्टेवार, महादेव मुळे, गोविंदअप्पा देशमुख, सुधीर थडकर, एच. आर. जंगमे, मुक्ताराम पिटले आदींची उपस्थिती होती.
लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST