शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आजोबा 105 तर आज्जीचं वय 95 वर्षे, वृद्ध चव्हाण दाम्पत्यांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 16:22 IST

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देलातूर ग्रामीणच्या काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

मुंबई - देशात कोरोना महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातक कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, 22 एप्रिलपासून राज्यात एकप्रकारे लॉकडाऊनच जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून कोरोनाचा मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी, सकारात्मक बातमी आहे. 105 वर्षांचे आजोबा अन् 95 वर्षांच्या आजीनें कोरोनावर मात केलीय. 

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची धडपड पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीतही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांग लागल्याचंही आपण पाहिलं. दुसरीकडे सोशल मीडियावरही भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पडत आहेत. मात्र, या नेगेटीव्ह वातावरणातही रुग्णाचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं मनोबल वाढविणारी एखादी माहिती समोर येते. लातूर जिल्ह्यातील चव्हाण दाम्पत्यांची कथा अशीच म्हणावी लागेल.   लातूर ग्रामीणच्या काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या आजी-आजोबाचा फोटो शेअर करत, ही आनंदाची बातमी दिली. सध्याच्या वातावरण कोरोना रुग्णांना धीर देणारी, त्यांचं मनोधैर्य वाढवणारी ही बातमी आहे. धीरज देशमुख यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिलीय. 

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असल्याने सोशल मीडिया आणि टेलिव्हीजनवरच अनेकांचा वेळ जात आहे. त्यातच, रुग्णालयातील विदारक दृश्य पाहून वेदना आणि दु:ख याशिवाय काहीच हाती लागत नाही. त्यामुळे, या आजी-आजोबाने कोरोनावर मात करुन कोरोनातून आपणही बरे होऊ शकतो, हाच मंत्र दिलाय, असेच म्हणावे लागेल.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसlaturलातूरDhiraj Deshmukhधीरज देशमुख