हणमंत जवळगा येथे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. बैठकीस सरपंच वर्षा पाटील, उपसरपंच महानंदा बालने, ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर, मुख्याध्यापक एस.एस. आलमले, तलाठी प्रमोद वंगवाड, चेअरमन विठ्ठलराव उदगीरे, रामदास बेद्रे, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार राजुरे, तुकाराम केंद्रे, हणमंत गिते, विजय जोगदंड, इंद्रजित बेडदे, श्रीपती बेडदे, सोमनाथ केंजे, बाबू जोगदंड, बाबू बेडदे आदी उपस्थित होते.
हणमंत जवळगा हे जवळपास १७०० लोकसंख्येचे गाव आहे. शहरी भागात ५०- ६० टक्के लोक राहतात. त्यापैकी २० टक्के नागरिक गावी परत आले आहेत. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, शिक्षक गावात राहत नाहीत. गावात १५ ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. गावात सुमारे ५ ते ६ विवाह आहेत. कोणीही विवाह रोखू शकत नाही. बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठ्यांनी सांगितले पाहिजेत, असेही गावकरी म्हणाले तेव्हा गावातील बांधकामधारकांना नोटिसा देऊन बांधकाम बंद करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले तसेच गावात ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली.
हणमंत जवळगा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांना चापोली ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार आहे. तलाठी, गावातील शाळेत पाच शिक्षक आहेत. त्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजेत, असे असे चेअरमन विठ्ठलराव उदगिरे म्हणाले.