शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Grampanchayat Result: जळकोटात भाजपची सरशी, महाविकास आघाडी दुसऱ्या स्थानावर

By हरी मोकाशे | Updated: December 20, 2022 17:41 IST

हावरग्यात पंजाबराव पाटील यांना चिठ्ठीने दिला कौल

जळकोट (लातूर) : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. येवरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवार नसल्याने तेथील जागा रिक्त राहिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर महाविकास आघाडी राहिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा एक उमेदवार सदस्य झाला आहे. दरम्यान, हावरगा येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठीच्या जनार्दन माने आणि पंजाबराव पाटील यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. चिठ्ठीची लॉटरी पंजाबराव पाटील यांना लागली.

तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या करंजीच्या सरपंचपदी भागवत सोनटक्के हे विराजमान झाले आहेत. उमरदरा सरपंचपदी यमुनाबाई बालाजी गुट्टे, सिंदगीच्या सरपंचपदी बायनाबाई संदीपान कांबळे, होकर्णा दामोदर बोडके, चेरा प्रकाश माने, लाळी खु. साक्षी विजयकुमार बिराजदार, हावरगा अनुराधा ज्ञानेश्वर भोपळे, उमरगा रेतू राजकुमार पन्हाळे, गुत्ती मीना यादव केंद्रे, माळहिप्परगा सुनीता रामचंद्र केंद्रे, पाटोदा बु. सुनील नामवाड, जगळपूर अश्विनी संदीप लोहकरे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण ५० जणांनी नोटाला पसंती दर्शविली. १२ गावच्या सरपंचपदासाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात होते. तसेच ११३ सदस्यांच्या निवडीसाठी २४९ उमेदवार नशीब अजमावित होते. त्यामुळे अटीतटीच्या लढती झाल्या होत्या.

सदस्य पदासाठीचे विजयी उमेदवार...चेरा - दिगंबर कावलवाड, जयश्री कटके, गोपाळ मोरे, झुंबर वाघमारे, प्रभावती मोरे, संतोष गडमे, भागवत माळी, बेबी गायकवाड, बालाजी किल्लेवाड.

पाटोदा बु. - रामचंद्र जाधव, इंदुताई मुछेवाड, अनिता काळे, लक्ष्मण केंद्रे, शांताबाई नावंदगे, तांबोळी मोमलबी, नवनाथ नामवाड, लहुकुमार माडे, भाग्यश्री नामवाड.होकर्णा - चंद्रकांत डोणगावे, पूनम गुंडरे, शेख जुबेदाबी, आकाश राऊतराव, सुलोचना मोरे, छाया देवकते, नामदेव बोडके, मल्लिकार्जुन भुरे, जमुनाबाई मोरे.

करंजी - बाबू घोटरे, सुमन घोटरे, लता सोनटक्के, गुंडू टाले, आम्रपाली कांबळे, दत्तात्रेय श्रीमंगले, शिला नरवटे,येवरी - स्नेहलता कांबळे, अहिल्याबाई भाले, सोमनाथ वाकळे, कौशल्य गव्हाणे, ज्ञानेश्वर वाकळे, अर्चना तीर्थे.

उमरदरा - ज्ञानोबा गुट्टे, मंजुळा गुट्टे, राजू गुट्टे, शोभा गीते, किशन मोरे, नंदुबाई गुट्टे.सिंदगी - सुनील बामणे, पिंजारी नसरुद्दीन, कांताबाई कांबळे, वैशाली केंद्रे, संगीता दळवे, मीनाबाई गौंड, राजू गीते, प्रयाग चाटे, लक्ष्मीबाई दळवे.

लाळी खु.- दामोदर भालेराव, यशोदा कांबळे, उषा उळागड्डे, माधव मिरजगाव, मंगलाबाई देवशेट्टी, गुणवंतराव पाटील, सुमन पाटील.हावरगा - पंजाबराव पाटील, कमलबाई कांबळे, कौशल्याबाई पवार, गणेश पवार, गीताबाई चट, वंदनाबाई चट, संभाजी मोरे.

उमरगा रेतू - गणपती भोगे, सुमेधा केंद्रे, अनुराधा ढोबळे, देशमुख खलीलमियाँ, द्रौपदाबाई भुरे, बालाजी केंद्रे, अंकुश गिते, देशमुख आशिया बेगम.गुत्ती - व्यंकट मुंडे, चंद्रभागा सूर्यवंशी, देविदास सांगळे, जयश्री केंद्रे, अनुसया केंद्रे, पुंडलिक सूर्यवंशी, यादव केंद्रे, उज्ज्वला मोरे, कल्पना मोरे.

माळहिपरगा - वर्षा केंद्रे, द्रौपदा सोनकांबळे, नारायण केंद्रे, इंदुमती केंद्रे, सुंदराबाई केंद्रे, पांडुरंग तिडके, उर्मिलाबाई केंद्रे, शेवंताबाई केंद्रे, बालाजी गोरेवार, कैलास आडे, शितल जाधव.जगळपूर - नरसिंग मोठे, शामराव लोहकरे, निर्मला लोहकरे, शेख मोहम्मद उमर, आम्रपाली वाघमारे, सीमा दुरनाळे, आकाश वाघमारे, हलीमाबी देशमुख, ईश्वर बेंबरे, पुंडलिक पोद्दार, भाग्यश्री बुके हे सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.

यावेळी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार राजाराम खरात, शिवराज एमपल्ले, आर. पी. शेख, अलिम शेरवाले आदींनी काम पाहिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतlaturलातूरBJPभाजपा