लाईफ केअर हॉस्पिटल ॲण्ड रिचर्स सेंटरच्या अध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते धान्य किटचे वितरण करण्यात आले. यावेळी जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, ॲड. लिंगराज पाटील, विनायकराव पाटील, ॲड. विक्रम पाटील, संजय पाटील, अमरेश्वर पाटील, गजानन पाटील, शुभम पाटील, रामेश्वर पाटील, करण पाटील, अनिकेत पाटील, रामेश्वर पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ही समस्या जाणून घेऊन ॲड. रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर आणि ऋषिका शैलेश पाटील चाकूरकर यांनी साई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप केले. यात तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, साखर, दाळ, मिरची, हळद आदी साहित्य आहे.
यावेळी रुद्राली पाटील चाकूरकर म्हणाल्या, जिल्ह्यासह मराठवाड्यातील गरजू आणि आवश्यकता असलेल्या कुटुंबास अन्नधान्याचे किट साई फाउंडेशनव्दारे देण्यात येईल. यावेळी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी कृषी महाविद्यालयातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.