देवणी तालुक्यातील गौंडगाव- विजयनगर, गुरदाळ, गुरनाळ आणि आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाच्या बुधवारी निवडी झाल्या. गौंडगाव- विजयनगर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना यश मिळाले. पण बुधवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीत धक्का बसला. त्यामुळे सरपंचपदी जयश्री शिवाजी बिरादार यांची तर उपसरपंचपदी परमेश्वर बोरुळे यांची बहुमताने निवड झाली.
तालुक्यातील गुरदाळ येथेही आश्चर्यकारकरित्या सरपंचपदी संदिपान पेटे यांची बहुमताने निवड झाली. गुरनाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुणाताई उमाकांत बर्गे यांची तर उपसरपंचपदी पंढरीनाथ माने यांची निवड झाली. तालुक्यातील आंबेगाव येथील सरपंचपद हे एसटी संवर्गासाठी राखीव ठेवले आहे. मात्र प्रवर्गातील सदस्य नसल्याने तेथील सरपंचपद हे रिक्त राहिले आहे. आंबेगाव येथील उपसरपंचपदी रेखा सचिन पाटील यांची बहुमताने निवड जाहीर करण्यात आली आहे.