शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुसऱ्या हाताने काढून घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:10 IST

उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी आले तर त्या शेतकऱ्यानाही शंभर टक्के पीकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते.

- धर्मराज हल्लाळे  

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्टचक्र कायम आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली तरी लाभ दिला जाईल, असे शासनाने जाहीर केले. त्याच वेळी एखाद्या मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली तर पीकविम्याची संरक्षित रक्कमही २५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हातचे गेले होते आणि आता रबीचा पेराही अत्यल्प झाला. त्यामुळे ज्या मंडळात कमी पेरा झाला त्यांनाही पीकविम्याचा लाभ मिळेल, असे वाटले होते.

पूर्वी साधारणत: महसूल मंडळात १०० टक्के पेरा झाला तरच पीकविमा भरता येत होता. त्यामध्ये शिथिलता आणून शासनाने २५ टक्केपेक्षा कमी पेरा झाला तरी शेतकऱ्यांना पीकविमा भरता यावा असा निर्णय घेतला. ज्यामुळे दिलासा मिळाला असे चित्र होते. परंतु, निर्णयामागून निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने पहिल्या निर्णयाला छेद देणारा दूसरा निर्णय जाहीर केला. ज्यामध्ये २५ टक्क्यांहून कमी पेरा झाला तर संरक्षित रक्कमही कमी होणार आहे. उदाहरणादाखल एखाद्या शेतकऱ्याने हरभऱ्यासाठी ३४६ रूपये पीकविमा भरला तर विम्याची संरक्षित रक्कम २३ हजार १०० रूपये मिळते. परंतु, संबंधित शेतकऱ्याच्या महसूल मंडळामध्ये रबीचा पेरा २५ टक्क्याहून कमी असेल तर त्याला संरक्षित रकमेच्या एक चतुर्थांश पैसे मिळतील. 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात ६४ टक्के पर्जन्यमान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपाच्या उत्पादनातही सुमारे ६० टक्क्यांनी घट झाली. रबीचा तर बहुतांश ठिकाणी पेराच झाला नाही. ज्यांनी पेरा केला त्यांना काही उगवेल याची आशा नाही. जलसाठे कोरडे पडले. हिवाळ्यातच प्रकल्पांनी मृतसाठा गाठला. शेतातील विहिरी आणि बोअरची पाणी पातळीही कमालीची घटली. अनेक ठिकाणी बोअरही कोरडेठाक पडले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत ज्यांनी उपलब्ध अत्यल्प पाण्यावर रबीचा पेरा केला, त्यांनाही आता पीकविम्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही. हरभऱ्याच्या विमा हफ्त्याची रक्कम कमी केली. त्याचबरोबर पीक संरक्षित रक्कमही ९०० रूपयांनी घटविली. ज्यामुळे २४ हजार रूपये मिळणारा पीकविमा आता २३ हजार १०० रूपये मिळणार आहे. त्यातही तो बहुतेकांना २५ टक्केच मिळेल. 

शासनाने यंदा मंडळनिहाय पीकविमा भरण्याची सोय उपलब्ध केली. पीकविमा भरण्यासाठी ८ अ चा उतारा, संबंधित पीकाचे पेरणी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक जोडणे आवश्यक केले. शेतकऱ्यांना सुलभ होणारे नियम केले. प्रारंभी दिलासा देणारा निर्णय घेतला अन् नंतर नव्याने नियमाने लाभावर मर्यादा आणल्या. एकंदर २५ टक्क्यांपेक्षा कमी पेरा झालेल्या भागातील एखाद्या शेतकऱ्याचेही उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी आले तर त्यांनाही शंभर टक्के पीकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती