शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

धक्कादायक! लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 20:57 IST

विशाल नगरात राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना घडली.

लातूर : शहरातील विशाल नगरात राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून खून करण्यात आल्याची घटना घडली. तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून, यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अपूर्वा अनंतराव यादव (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अपूर्वा ही घरात एकटीच होती. तिची आई देवदर्शनासाठी घराबाहेर गेली होती. तर वडील हे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, हल्लेखोराने ती घरात एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. देवदर्शनावरून घरी परतलेल्या आईला अपूर्वा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.शेजारी राहणा-या काही लोकांनी तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, तोपार्यंत अपूर्वाचा मृत्यू झाला होता. शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी अपूर्वाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी भेट देऊन पंचनामा  केला.जमखंडी येथे वैद्यकीय शिक्षण...लातुरात आपल्या आई-वडिलांसह राहणा-या अपूर्वा यादव ही तरुणी कर्नाटक राज्यातील जमखंडी-बागलकोट येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. बीएचएमएसमध्ये प्रथम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ती लातुरात आपल्या घरी आली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास ती घरात एकटी होती. यावेळी हल्लेखोर घरात घुसून तिचा खून केला. हल्ल्यानंतर मारेकरी घराला बाहेरून कडी लावून पसार झाले. आई घरी आल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांना सांडलेला चहा आणि कप आढळून आला.खुनाचे कारण अस्पष्ट...अपूर्वा यादव या तरुणीचा खून कशासाठी झाला, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या कारणांचा लातूरचे पोलीस शोध घेत आहेत. अपूर्वा ही एकुलती एक मुलगी होती. तिचा असा निर्घृण खून करण्यात आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत, या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी दिली.अपूर्वावर ढोकीत गुन्हा दाखल...अपूर्वा यादव आणि एका युवकावर ढोकी (जि. उस्मानाबाद) येथील पोलीस ठाण्यात जुलै महिन्यामध्ये कलम ३०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात युवकाला अटकपूर्व जामीन मिळला. तर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या अनुषंगानेही लातूरचे पोलीस तपास करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे म्हणाले.

टॅग्स :laturलातूर