लातूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांना आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी युनिव्हर्सल पास ऑनलाईन लिंकवरून मिळत आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर निर्धारित वेळेनंतर या लिंकवरून स्वत:चे छायाचित्र अपलोड करून माहिती भरली, त्यांनाही पास उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात ३१ टक्के नागरिकांना पहिला, तर ११ टक्के नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून जिल्ह्यात ४२ टक्के लसीकरण झाले असल्याचे आराेग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
लसीचा मागणीनुसार होतोय पुरवठा...
जिल्ह्यात मागणीनुसार लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात दररोज लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस मिळून ४२ टक्के लसीकरण झाले आहे. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी
दोन्ही डोस घेतले किती...
फ्रंटलाईन वर्कर्स २६,९७७
आरोग्य कर्मचारी १५,५९७
१८ ते ४४ वयोगट २,६८,०२९
४५ पेक्षा अधिक वयोगट १,४९,५१२
एकूण झालेले लसीकरण ८,५९,३९३