शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमीनीवर अतिक्रमण करून घर बांधले, मावलगावचे सरपंच झाले अपात्र

By आशपाक पठाण | Updated: June 20, 2024 19:59 IST

गायरान जागेत घराचे बांधकाम केल्याचे निष्पन्न

लातूर : गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करीत घरबांधकाम केल्याचा ठपका ठेवत अहमदपूर तालुक्यातील मावलगावचे सरपंच शिवाजी नरबाजी संपते यांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अपात्र ठरविले आहे. शिवाय, मावलगावचे सरपंचपद हे रिक्त झाल्याचे घोषित केले आहे.

मावलगाव येथील जमीन गट नंबर २८८ मधील ३.२० हे.आर. सरकारी गायरान जमीन ही शासनाच्या मालकी व कब्जेची आहे. याठिकाणी सरपंच शिवाजी संपते यांनी २ हजार चौरस फुट क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ग्रामसेवकाशी संगमणत करून ग्रामपंचायत दप्तरी नोंद लावून घेतली. अतिक्रमित क्षेत्राचा मालमत्ता क्रमांक टाकून ८ अ उतारा केलेला आहे. याठिकाणी सक्षम प्राधिकरणाकडून बांधकाम परवाना न घेता पक्के आरसीसीचे घर बांधकाम करून ग्रामपंचायत दप्तरी तशी नोंदही केली. यासंदर्भात मावलगाव येथील गणपत भानुदास संपते व रंगनाथ किशनराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सर्व साक्षी पुरावे तपासणी झाल्यावर गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याने सरपंच शिवाजी संपते यांना अपात्र घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे सरपंचपद हे रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. अर्जदाराकडून ॲड.जीवन करडे यांनी बाजू मांडली.

सरपंचपद रिक्त झाल्याची घोषणा...अर्जदार गणपत भानुदास संपते, रंगनाथ किशनराव पाटील (रा. मावलगाव) यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) (जे-३), १६ व ५३ अंतर्गत यांनी दाखल केलेला अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला. गैरअर्जदार शिवाजी संपते यांना ग्रामपंचायत मावलगाव येथील सरपंच पदावरून तत्काळ प्रभावाने अपात्र ठरविण्यात येते. थेट सरपंचद पद हे रिक्त झाल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घोषित केले.

 

टॅग्स :laturलातूरsarpanchसरपंच