शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या विवाह कार्यासाठी घरामध्ये ठेवलेल्या पैशावर चाेरट्याचा डल्ला, तीन लाखांची रोकड लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2025 16:47 IST

लातूरमध्ये दिवसाढवळ्या फाेडले घर

राजकुमार जाेंधळे / लातूर : मुलीच्या लग्नकार्यासाठी घरामध्ये ठेवलेल्या तब्बल २ लाख ८० हजारांच्या राेकडवर अज्ञात चाेरट्याने डल्ला मारल्याची घटना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लातुरातील लाड गल्लीत घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, प्रणिता गंगालाल डांगूर (वय ४२, रा. लाड गल्ली, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. मुलीच्या लग्न कार्यासाठी लागणारे राेख पैसे घरात ठेवले हाेते. दरम्यान, या पैशावर नजर ठेवत अज्ञात चाेरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप ताेडून, कडी काढून आत प्रवेश केला. घरातील लाेखंडी पेटीमध्ये ठेवलेली तब्बल २ लाख ८० हजारांची राेकड चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील लाड गल्ली येथे घडली.

घटनास्थळी गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात साेमवारी अज्ञात चाेरट्यांविराेधात गुरनं. २४१ / २०२५ कलम ३३१ (३), ३०५ (ए) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक डी. एन. काळे हे करीत आहेत.

पाेलिस पथकाकडून संशयित आराेपीचा शाेध

रविवारी दिवसा ही घरफाेडी करण्यात आली असून, आराेपी हा परिचित असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. लवकरच या आराेपीच्या मुसक्या आवळण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले आहे. लग्न कार्याची लगबग, त्यासाठी लागणारी राेख रक्कम घरात ठेवल्याची माहिती चाेरट्याने हेरून त्यावर डल्ला मारला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर