शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला लातुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:29 IST

: शहरातील मळवटीरोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीला गांधी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत गुरुवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लातूर : शहरातील मळवटीरोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीला गांधी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत गुरुवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले, लातूर येथील श्री सिद्घेश्वर-श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्री निवासस्थान परिसरात दरोडा टाकण्याची तयारी करीत असलेली माहिती गांधी चौक पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दरम्यान, यात्री निवासाच्या पोर्चमध्ये दरोड्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीवर पोलिसांनी झडप मारली. यावेळी संतोष उर्फ पापा बब्रुवान माने (रा. जयनगर, लातूर), हिरामण गणपती कांबळे (रा. जानवळ ता. चाकूर), अरबाज आयुबखान पठाण (रा. काळे गल्ली, लातूर), राजू बाबुराव चिंताले (रा. कोल्हे नगर, लातूर) आणि यशपाल खंडू शिरसाठ (रा. इंदिरा नगर, लातूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काठ्या, मिरची पूड, लोखंडी रॉड, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक महेश अंबादासराव गळगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्रेहा पिंपरखेडे हे करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा