शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना

By हणमंत गायकवाड | Updated: August 26, 2022 17:45 IST

Ganesh Mahotsav: गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना परवाना देताना किमान शंभर वृक्ष लावण्याचे मान्य करून घेण्याबरोबरच गतवर्षी लावलेल्या वृक्षांचे संगोपन केल्याचा पुरावाही घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र नगण्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मांजरा, तेरणा नदीच्या दुतर्फा वृक्ष लावण्याची मोहीम राबविली आहे. शाळा-महाविद्यालये व संस्थांचा सहभाग घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये नदीपात्राच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. आता जिल्हाभरातील गणेश मंडळांना वृक्ष लावण्याचे निर्देश दिले आहेत. गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. मंडळांना परवाना देताना तसे लिहून घेतले जात आहे. शिवाय, गतवर्षी लावलेल्या झाडांचे संगोपन केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. 

परवानगी पत्रांवर १०० वृक्षांचे रोपण करण्याची सूचना... पोलीस विभागाने गणेश मंडळांना परवाने देताना मंडळांकडून प्रत्येकी शंभर वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याची सूचना परवानगीपत्रावर नमूद करावी. तसेच दरवर्षी परवानगी देताना पूर्वी लावलेल्या किमान शंभर झाडांचे जतन केल्याचा पुरावा घ्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली आहे. वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरGanesh Mahotsavगणेशोत्सव