शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना पाणी देऊन गांधीगिरी, औशात राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर संताप

By हरी मोकाशे | Updated: December 24, 2022 17:44 IST

Latur News: औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या.

- हरी मोकाशेलातूर -  औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या.

औसा नगरपालिकेत मनमानी कारभार सुरू असून लोकहिताच्या कामांकडे कानाडोळा केला जात आहे. प्रत्येक कामात नागरिक, व्यापाऱ्यांची अडवणूक केली जात आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. शहराची शोभा वाढविण्यासाठी मुख्य रस्त्यावरील हाश्मी चौक ते बसस्थानकापर्यंत दुभाजकात फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. परंतु, त्यास पाणी नसल्याने ती वाळत आहेत. लाखोची बिले देणाऱ्या पालिकेकडे झाडांना पाणी देण्यासाठी पैसे नाहीत का, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला. वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शहराची शोभा वाढविणाऱ्या झाडांचे संगोपन करेल, असे डॉ. अफसर शेख यांनी सांगितले.

जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध...राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्या निलंबनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख, युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, जावेद शेख, गोविंद जाधव, दत्तात्रय कोळपे, मेहराज शेख, वलीखाँ पठाण, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, कीर्ती कांबळे, संगमेश्वर उटगे, ॲड. शिवाजी सावंत, सुनील बनसोडे, निशांत वाघमारे, ॲड. दत्ता घोगरे, बाळू जाधव, वसीम बोपले, अशोक गरड, शिवाजी शिंदे, उमर पंजेशा, युनूस चौधरी, बालाजी कांबळे, आनंद बनसोडे, रूपेश दुधनकर, विनायक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस