शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:17+5:302021-07-22T04:14:17+5:30

उदगीर शहरातील मुख्य मार्गांचे कामे प्रगतीपथावर असून लातूर ते उदगीर रस्ता, जळकोट ते उदगीर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ...

Funding for city development will not be reduced | शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही

शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही

Next

उदगीर शहरातील मुख्य मार्गांचे कामे प्रगतीपथावर असून लातूर ते उदगीर रस्ता, जळकोट ते उदगीर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक रस्ता, तोंडार पाटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यांचे कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे प्रगतिपथावर आहेत. शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयांची कामे प्रगतिपथावर असून, मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत व सोसायटीतील रस्ते व गटारांची कामे या पुढील काळात पूर्ण केली जातील. शहरातील सामाजिक सभागृहे, अंगणवाडी इमारती, गार्डन यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, ज्ञानेश्वर पाटील, शहराध्यक्ष समीर शेख, दुर्गाप्रसाद कुलकर्णी, प्रा. भालेराव, चंदर वैजापुरे, श्रीकांत पाटील, जावेद शेख, अतिक शेख, पंडित सुकणीकर, सूर्यकांत जगताप, दतात्रय सूर्यवंशी, जगनाथ शेटकार, बसवण्णा बावगे, कपील शेटकार, सुरेश सूर्यवंशी, मल्लिकार्जुन वारकरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Funding for city development will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.